PostImage

pramod abhiman raut

Oct. 16, 2023   

PostImage

Kolara grampnchayat loc ; कोलारा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे व ग्रामसेवकांच्या …


 

 ग्रामपंचयतीवर संपूर्ण ग्रामवासीयाचा जन आक्रोश    

चिमूर प्रतिनिधी :-

         चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी कोलारा ग्रामपंचायत असून, येथील सरपंच तथा सदस्य संपूर्ण कमिटीने मिळून कोलारा ग्रामवाशी यांचा विश्वासघात केला असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
      कोलारा येथील सरपंच तथा कमिटी यांनी परस्पर आपसात आपल्या स्वार्थासाठी नवीन जिप्सी लावण्यासाठी वनविभागाला आपली आन - शान - बाण विकून वनविभाग ताडोबा यांचे व ग्रामवाशीयांचे प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी सरपंच ग्रामपंचायत कमिटी आपसात आर्थिक व्यवहार करून परस्पर आपसात कोलारा ग्रामवासीयांच्या डोळ्यात तिखट टाकून संपूर्ण ग्रामवासियाचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करण्यात आला. त्या कारणामुळे वनविभागाच्या आर्थिक व्यवहारामुळे व नवीन जिप्सी रोटेशनला लावण्याचे प्रलोभनापोटी संपूर्ण ग्रामवासी यांचा विश्वासघात करण्याचा प्रकार आज कोलारा येथील ग्रामवासी यांच्या लक्षात आल्यामुळे हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला व संपूर्ण गावकरी एकत्रित होऊन एक होऊन ग्रामपंचायत कोलारा येथील ग्रामपंचायत कमिटी मुर्दाबाद विश्वासघाती ग्रामपंचायत सरपंच असे नारे देऊन   15 ऑक्टोंबर 2023 ला संपूर्ण गावकरी सायंकाळी जवळपास 8 वाजताच्या दरम्यान एकत्र होऊन एकमताने कोलारा ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावातील महिला मंडळ' संपूर्ण युवक' संपूर्ण गावातील जेष्ठ नागरिक व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व कमिटी व संपूर्ण इको डेव्हलपमेंट समिती व गावातील युवक मंडळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच व कमिटी यांचा निषेध म्हणून संपूर्ण गावाकडून ग्रामपंचायतला कुलूप ठोकून निशेष दर्शविण्यात आला.    
          येणाऱ्या गावकऱ्यांचे वनविभागाकडील प्रश्न मार्गी न लागल्यास कोलारा येथील ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा घेण्याचा निर्धार ग्रामवासीयांनी घेतला आहे. व गावकऱ्यांकडून सरपंच सहित ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे असे संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

  अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊ
      ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करून नव्याने कमिटी स्थापन करावी अशी संपूर्ण गावकरीची मागणी आहे. व वन विभाग  ताडोबा यांच्याकडून कोलारा येथील ग्रामवासियांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास कोलारावाशी आंदोलन तीव्र करतील असे कोलारा ग्रामवासीयांचे म्हणणे आहे. तरी प्रशासनाने त्वरित प्रश्न मार्गी लावावे नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण गावकरी मोर्चा घेऊन जाणार अशी गावकऱ्यांची चर्चा होत आहे.